In this pandemic lockdown period, we are conducting classes online...     
Mrs Shubhada Bam - Tambat

Swarada Music Academy

(A Melodious Education of Music)

SWarda Music Academy was started in 1991 on 17th Oct in an effort to in part music lessons to students by Mrs. Shubhada Bam – Tambat.

Mrs. Shubhada Bam – Tambat is a melodious personality, who started her musical journey as a child, a sangeet visharad with a voice as sweet as honey.

Her musical journey started with Bole Re Papihara as First Prize winner (in competition held by Ras-Shrafalya ,Nashik).

It has been 51 glorious years since she serving in this field of music. As a singer she has mesmerized thousand by her soulful singing and performance.

Her soulful singing gave the audience tremendous joy when "Chandane Shimpit Jashee" came into light. Asha Bhosales melodious songs rendered by Shubhada Bam-Tambat creates music, it almost gives the feeling of devotion to Sur, Tal and Laya.

She also got golden opportunity t participate in Gata Rahe Mera Dil (Live concert of Swarsamragni Lata Mageshkar at Pune on 16 Dec 2000)

She also had an opportunity to work with welknown singers and music composers of Marathi Film Industry like Anil Mohile, Sudhir Gadgil, Anand Modak, Shridhar Phadake, Yashwant Deo, Gajananarao Watave and poetess of Marathi literature Shanta Shelke, who have appreciated her singing.

सुगम संगीताविषयी

'संगीत' या तीन अक्षरात, सर्व जीव सृष्टीला चैतन्य, आनंद देण्याचे सामर्थ्य आहे. गायन, वादन व नृत्य या तीन कलांचा समावेश 'संगीतात ' होतो.

भारतीय संगीताचे दोन प्रकार आहेत.

  • 1) शास्त्रीय संगीत
  • 2) सुगम संगीत

शास्त्रीय संगीत म्हणजे निरनिराळ्या रागरागिण्यांवर आधारलेले संगीत. सुगम म्हणजे सहजगत्या कळणारे गाणे. सर्वसामान्य माणसांना सुगम संगीत हे लवकर पसंत पडते . कारण त्यात भक्तीगीते, भावगीते, अभंग, लावण्या, चित्रपटगीते यांचा समावेश होतो. शास्त्रीय संगीतात सर्वात जास्त महत्व, स्वर व ताल यांना असते. तर सुगम संगीतात स्वर व ताल यांच्या बरोबरच, शब्द, काव्य, त्यातील भावना यांनाही तेवढेच महत्व असते व अत्यंत कमी वेळात, गायक कलाकाराला गाण्यातील भाव भावना लोकांसमोर पोहोचवाव्या लागतात.

शास्त्रीय संगीतात एक राग, आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने व पाहिजे तितका वेळ विस्तार करून गाऊ शकतो. परंतु सुगम संगीतात जे प्रकार असतात ,त्या सर्वांना वेळेचे बंधन असते. अत्यंत थोड्या अवधीत ते गीत लोकांच्या मनापर्यंत जाऊन ठसवावे लागते. पूर्वीपासून सुगम संगीत हे लोकांच्या मनातील भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. भक्तीगीत, अभंग यातून आपण आपल्या भक्तीभावना व्यक्त करतो, भावगीतातून प्रेम ,वात्सल्य, माया, रुसवा, इ. भाव व्यक्त करता येतात. समरगीते, देशभक्तीपर गीते, यातून देशाविषयीचे प्रेम, आदर व्यक्त झालेला असतो. चित्रपटातून एखादा प्रसंग परिणामकारक होण्याकरिता गाण्यांचा आधार घेतला जातो, ते सर्व सुगम संगीतच!

सुगम म्हणजे कळण्यास सोपे ! परंतु गाण्यास अवघड असे आहे. कारण त्याकरिता कवीने गीतात व्यक्त केलेल्या भावना समजावून घेऊन गीताच्या माध्यमातून, केवळ तीन ते चार मिनीटात, ताला सुरात व कुठेही शब्दांची अयोग्य तोड न करता, लोकांपर्यंत, त्यांना आवडेल अशा स्वरूपात पोहोचविणे जरुरीचे असते. सर्वसामान्य माणसाच्या मनाला आनंद देणारे व क्षणभर सर्व चिंता, काळज्या, दु:ख विसरायला लावणारे संगीत म्हणजे सुगम संगीत!