Testimonials

What our students say...

##Tap on photo to enlarge

सौ. सुप्रिया कोंडो, नाशिक (गृहिणी)
09 June 2020 (6 years ago)

माझा मुलगा स्वरित गेले नऊ महिने स्वरदा म्युझिक ॲकेडेमीमध्ये गायन शिकत आहे. शुभदा मॅडम अगदी उत्तम प्रकारे संगीताचे ज्ञान देत आहेत. तो अगदी उत्साहाने क्लासला जातो. क्लासमध्ये गाण्यासोबतच मुलांना संस्काराचे व शिस्तीचे धडेही दिले जातात. मुलांना शिकवली जाणारी गाणी ही त्यांच्या वयाला अनुसरून असतात. एक पालक म्हणुन मी माझ्या मुलाला क्लासमध्ये पाठवून खूप समाधानी आहे. धन्यवाद !




सौ. भावना भऊरकर, नाशिक (गृहिणी)
07 June 2020 (6 years ago)

माझा मुलगा चि. समर्थ भऊरकर हा स्वरदा म्युझिक अकँडमी मध्ये तबल्याचे शिक्षण घेत आहे. त्याने तबला लाईट म्युझिकच्या दोन परीक्षा स्वरदा म्युझिक अकँडमी मधुन दिलेल्या आहेत.

ही संस्था म्हणजे संगीत क्षेत्रातील निष्णात , विद्वान व्यक्तींचा त्रिवेणी संगम आहे. शिस्त , संस्कार आणि ज्ञान ह्या त्रिसूत्रींमुळे समर्थ क्लासमध्ये शिकविलेले अतिशय श्रध्देने, तन्मयतेने शिकतो. नवीन विद्यार्थ्यांना उपलब्ध प्लँटफॉर्म विद्यार्थ्यांना उर्जा देते. आत्मविश्वास निर्माण करतो.

अनुभवी गुरूजनांना कुणाचं प्राविण्य कशात आहे हे लगेच लक्षांत येते. समर्थला तबल्यासोबतच इतर वाद्य हाताळण्याचाही अनुभव मिळतोय.

स्वरदा म्युझिक अकँडमी ही फक्त संगीत शिकवण्यापुरती मर्यादित नसून येथे कळत नकळत ब-याच चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. जसे की वेळेचे महत्व, शिस्त, वैचारिक स्थिरता आणि असे बरेच काही. सगळ्याच गुरूंकडून विद्यार्थ्यांना खूप प्रेमही मिळते.

ही संस्था म्हणजे एक कुटूंब आहे आणि त्याचा एक भाग माझा मुलगाही आहे या गोष्टीचे मला खूप समाधान वाटते.

धन्यवाद !




सौ. आरती संजय कुलकर्णी, नाशिक (गृहिणी)
17 May 2020 (6 years ago)

मी फेब्रुवारी २०१६ पासून "स्वरदा म्युझिक अकॅडमी" ची शिष्या आहे. माझ्या गुरू सौ.शुभदा बाम-तांबट ह्यांच्याकडे सुगम संगीत शिकत आहे.

आम्हाला भावगीत, भक्तिगीत, अभंग,लावणी, चित्रपटगीत असे विविध प्रकार शिकवले जातात. मॅडम आमच्या कडून अगदी उत्तम रित्या गाणी करवून घेतात.गाणंं लिहिल्यावर त्याचा अर्थ समजावून दिला जातो.

दर वर्षी जानेवारी महिन्यात परीक्षा पण होते ...ती अनिवार्य नाही पण ... परीक्षा दिली की आपल्याला समाधान होते आणि आपला आत्मविश्वास वाढतो.

दरवर्षी क्लासचा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला जातो. त्या कार्यक्रमात सर्व शिष्यांची विविध गाणी सादर होतात.

ह्या अकॅडमी ची खूप प्रगति होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व शुभेच्छा !




सौ. गौरी गाडगीळ, नाशिक (गृहिणी)
14 May 2020 (6 years ago)
गेल्या 2 वर्षांपासून तांबट मॅडम कडे गाणे शिकत आहे.जर तुम्हाला शास्त्रशुद्ध सुगम संगीत शिकायचे असेल तर नाशिक मध्ये आज या क्लास शिवाय पर्याय नाही. विशेष म्हणजे आमच्या मॅडम आमच्याकडून भरपूर मेहनत करून घेतात. त्या स्वतः अनुभवी व उत्कृष्ट स्टेजपरफॉर्मर असल्याने तसेच  परफेक्शनिस्ट  असल्यामुळे सूर ताल लय ह्याबाबतीत त्यांच्याकडून उत्तम  मार्गदर्शन मिळते. हसतखेळत पण परिपूर्ण मार्गदर्शन आम्हाला ह्या क्लास मध्ये मिळते त्याबद्दल मॅडम चे मनःपूर्वक आभार


श्री. पलाश सचिन शेवाळे, नाशिक (विद्यार्थी)
17 April 2020 (6 years ago)
मी गेल्या तीन वर्षापासून ' स्वरदा म्युझिक ॲकॅडमी क्लास मध्ये की - बोर्ड /  सिंथेसायझर शिकत आहे . आता पर्यत मी दोन परीक्षा दिलेल्या आहेत . हा क्लास अतिशय चांगला आहे . येथे अगदी Basic पासून शिकवले जाते . हा क्लास अतिशय शिस्तप्रिय आहे . तसेच ह्या क्लास मध्ये वेळेचे नियोजन perfect केलेले असते . ह्या क्लासचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा प्रत्येक मुलाला Perform करण्याची संधी देतात . म्हणजे प्रत्येक मुलाला त्याचा platform मिळतो आणि त्यामुळेच माझ्यामध्ये stage daring आलेले आहे . माझ्या प्रत्येक गाण्याचा सराव ह्या क्लासमध्ये चांगल्या पद्धतीने घेतला जातो.


श्री. मालपाठक मंगेश, नाशिक (व्यवसाय)
06 April 2020 (6 years ago)
माझी मुलगी मनस्वी मालपाठक गेल्या 4वर्षांपासून या ऍकॅडमीमध्ये शिक्षण घेत आहे. हा क्लास लावल्यानंतर तिच्या गाण्यांत सुधारणा झाली आहे. त्याबरोबरच गाण्यातले बारकावे, उच्चार, गाण्यातली पद्धत, आवड यांत लक्षणीय प्रगती  झाली  आहे.

स्वतः शुभदा मॅडम, नवीन सर, व निनाद सर यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली अकॅडमीची संगीतमय व संस्कारक्षम वाटचाल अशीच अविरत सुरेल होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना... 


कु. मनस्वी मंगेश मालपाठक, नाशिक (विद्यार्थीनी)
05 April 2020 (6 years ago)
स्वरदा  म्युझिक अकॅडेमी मधे गेल्या 4 वर्षापासून शिकत आहे. मला क्लास म्हणजे दुसरे घरच वाटते. कारण इथले शिस्तबद्ध तरीही खेळीमेळीचे वातावरण. मॅडमना आम्ही लहान विद्यार्थी काकू म्हणतो. त्या गाणे शिकवताना गाण्याचा अर्थ, शब्दोच्चार, व्याकरणही शिकवतात. काकूंच्या प्रोफेशनल स्टेज परफॉर्मन्समधे  गाण्याची संधीही त्या आम्हाला देतात. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढतो. आमच्याकडून काही चुका झाल्या तर समजावून सांगतात. क्लासच्या वर्धापनदिनाच्या दिवशी आम्हा स्टुडंट्सचा परफॉर्मन्स असतो. त्याची कसून प्रॅक्टिस घेतली जाते. त्यामुळे आमचे गाणे चांगले होते. नवीन सर आणि निनाद सर आम्हाला तालवाद्ये आणि सिन्थेसाईझरची माहिती देतात. स्वरदा म्युझिक अकॅडेमीमुळे माझी गाण्यात खूपच प्रगती होत आहे आणि आत्मविश्वासही वाढला आहे.


कु. पूजा शैलेंद्र दुसाने, नाशिक (विद्यार्थिनी)
16 March 2020 (6 years ago)

मी स्वरदा म्युझिक अकॅडमी मध्ये गेल्या चार वर्षापासून सौ शुभदा बाम - तांबट यांच्याकडे गाण्याच्या क्लासला जात आहे. आमच्या क्लास बद्दल जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे आम्हाला हा क्लास नसून मंदिरच आहे असे वाटते. आमच्या मॅडम प्रत्येक विद्यार्थ्याकडे काळजीपूर्वक लक्ष देतात मग तो लहान असो वा मोठा त्यांचेकडून गाणे संगीत वगैरे सर्व काही छान पद्धतीने करून घेतात व आम्हाला पण खूप छान वाटते. आमच्या क्लास मध्ये मॅडम गाणं शिकवताना त्या गाण्याचा अर्थ व्यवस्थित पद्धतीने आम्हाला समजावून सांगतात. दरवर्षी आमच्या क्लासचा वर्धापन दिन असतो .मॅडम आम्हाला व्यवस्थित रित्या प्रत्येकाच्या आवाजानुसार योग्य ते गाणं निवडून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून भरपूर सराव करून घेतात. त्यानंतरच स्टेजवर गाणे सादर करायला देतात. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढतो. "किती सांगाव्या आठवणी.. शिणली मम लेखणी.. आकाशातील तार्‍यांची करेल का कुणी मोजणी...

" गुरुने दिला ज्ञानरूपी वसा

आम्ही चालवू हा पुढे वारसा..."

असेच प्रेम राहू द्या.



श्री. भास्कर पद्माकर कुलकर्णी, नाशिक (निवृत्त अधिकारी - लेखा विभाग)
11 March 2020 (6 years ago)

गेल्या तीन वर्षापासून आम्ही दोघे म्हणजे मी भास्कर पद्माकर कुलकर्णी आणि माझी मुलगी धनश्री आपल्या 'स्वरदा' क्लासमध्ये 'सुगम संगीत' शिकण्यासाठी नियमित येतो. सौ. शुभदा तांबट मॅडम आणि श्री.नवीन तांबट सर यांनी सुगम संगीताचे खूप सुंदर मार्गदर्शन मिळत आहे. कवीश्रेष्ठ ग. दि. मां.नी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले आहे-

"अरे कुंभारासारखा गुरू नाही रे जगात

वरी घालतो धपाटा आत आधाराचा हात"

आम्हालासुद्धा सुगम संगीत शिकवताना सौ. तांबट मॅडम प्रत्येक गाण्यातले बारकावे, -हस्व-दीर्घ, श्वास कुठे सोडायचा इ. सर्व प्रकारचे धडे गिरवून घेतात. त्यामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्याना त्यात गोडी निर्माण होते. आमच्या 'स्वरदा' क्लासमध्ये भावगीत, भक्तीगीत, अभंग, चित्रपट गिते आणि त्याबरोबर ताल, राग याचेही शिक्षण मिळते. क्लास सुरू होतानाच 'गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु.....आणि ओंकार म्हणून घेतले जातात आणि क्लास संपायच्या आधी 5 मिनिटे सर्व विद्यार्थ्यांकडून सुविचार, विनोद, कविता इ.चे वाचन केले जाते. शब्दांचे उच्चार हे शुद्धच असले पाहिजेत याकडे मॅडमचे खास लक्ष असते आणि मला वाटते आमच्या क्लासचे ते वैशिष्ट्य आहे.

असा हा आमचा 'स्वरदा' क्लास उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो आणि आमच्यासारख्या व पुढेही क्लासमध्ये नवीन येणा-या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळो तसेच सौ. शुभदा तांबट मॅडम आणि श्री. नवीन तांबट सर यांना दिर्घायू लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.




श्री. जाखडी, नाशिक (नोकरी)
16 June 2008 (18 years ago)

अडलेल्या पाण्याला ज्याप्रमाणे वाट हवी असते, त्याप्रमाणे कुठल्याही कलेला योग्य वळण देण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. नाशिकमध्ये सौ.शुभदा तांबट व श्री नवीन तांबट यांनी 'स्वरदा सुगम संगीत विद्यालय' सुरू करून या कलासक्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची सुवर्णसंधी प्राप्त करून दिली आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने विद्यालयाला शुभेच्छा !




श्री. विश्वास उत्पात, नाशिक (एम.आर.)
12 March 2003 (23 years ago)

मी काही लेखक नाही, परंतु क्लासच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जे काही मनात आले, ते लिहीण्याचा प्रयत्न...

सुगम संगीताचा क्लास काय असतो, या उत्सुकतेपोटी क्लास लावला आणि इथेच रमून गेलो. माझी कल्पना होती, फक्त निरनिराळ्या प्रकारची गाणी शिकवतील. पण ही गाणी शिकवतांनाही मॅडम ज्याप्रमाणे वैयक्तिक तयारी करून घेतात हे पाहून थक्क झालो.

इतर गावात असतांनाही मी गायन शिकण्यासाठी क्लासला जात असे पण सुगम संगीतात आवाज, सूर, ताल याबरोबरच शब्दोच्चारालाही महत्व आहे हे प्रथम या क्लासमध्येच समजले. गातांना श्वास टिकावा म्हणून क्लासला सुरुवात करतांना 'ओम्' म्हणून घेणे, शब्दोच्चार, शब्दफेक नीट जमावी म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून परिच्छेद वाचून घेणे हे उपक्रम मी फक्त याच क्लासमध्ये बघितले. सभाधीटपणा वाढवा म्हणून दर दोन महिन्यांनी परिक्षेप्रमाणे बैठक, सर्व विद्यार्थ्यांचा आपापसात परिचय व्हावा म्हणून वार्षिक सहल आयोजित करणे हे उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत. क्लासच्या भरभराटीचा आलेख असाच उंचावत जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना! वर्धापनदिनास हार्दीक शुभेच्छा !!




सौ. वैशाली मनवळ, नाशिक (गृहिणी)
21 August 2002 (24 years ago)

सर्वसामान्य माणसाच्या मनाला आनंद देऊन, क्षणभर सर्व चिंता काळज्या विसरायला लावणारे संगीत म्हणजे 'सुगम संगीत'. अशा संगीताचे भरभरून ज्ञान देणार्‍या आमच्या मॅडम म्हणजे सौ.शुभदा तांबट, नावाप्रमाणेच संगीताचे धडे आम्हाला देऊन आमचे शुभ करणार्‍या 'शुभदा'! त्यांचे पती श्री. नवीन तांबट, (सर) आम्हाला तालाविषयी मार्गदर्शन करतात. त्यांच्या सर्व कुटुंबानेच हे कार्य मनापासून स्विकारले आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याकडे सारखेच लक्ष पुरवले जाते. गाणे म्हणतांना कसे बसावे इथपसून, शब्दफेक कशी करावी, श्वासाचे तंत्र कसे सांभाळावे, भावपूर्णता येण्यासाठी कसा प्रयत्न करावा हे सगळे शिकवले जाते. त्यासाठी आवश्यक तिथे शास्त्रीय संगीत, लोकगीत, भक्तिगीत, भावगीत, लावणी, असे निरनिराळे प्रकार शिकवले जातात.

क्लासचे विद्यार्थी एकत्र यावेत म्हणून वार्षिक सहल आयोजित केली जाते. प्रत्येक विद्यार्थी चांगला तयार व्हावा म्हणून बाई व सरही खूप मेहनत घेतात. कारणाशिवाय कधीही सुट्टी मिळत नाही. सर्व बाजूंनी योग्य संगीत शिक्षण देणारे हे आमचे 'स्वरदा सुगम संगीत विद्यालय' आणि हातचे काही राखून न ठेवता ज्ञानदान करणार्‍या सौ.शुभदा मॅडम!




सौ. जयश्री पाठक, नाशिक (शब्दश्री प्रकाशन)
18 August 2000 (26 years ago)

17 ऑक्टो. 1991 रोजी दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर स्वरदा सुगम संगीत विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि नाशिकच्या संगीत क्षेत्रात हे 'सोन्याचे पान' स्वरसाजाने झळकू लागले.

या विद्यालयाचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे पाच ते साठ या वयोगटातील विद्यार्थी - विद्यार्थिनी हौसेने शिकायला येतात. कोणत्याही शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते, हेच यावरून सिद्ध होते. अभंग, भक्तीगीत, भावगीत, देशभक्तीपर गीत, भारुड, लावणी, चित्रपट गीत आणि विद्यार्थी मेहनत घेऊन तयार झाले की नाट्यगीतही शिकवले जातात. शब्दोच्चार, श्वासनियंत्रण, माईकसमोर गातांना विशिष्ट अक्षरे उच्चारतांना घ्यावयाची काळजी इ.सर्व बाबींकडे वैयक्तिक लक्ष पुरवले जाते. सुगम संगीत ऐकतांना अगदी सोपे वाटते. पण ते प्रत्यक्ष गाण्यास किती ठिकाणी लक्ष ठेवावे लागते, किती व्यवधाने पाळावी लागतात, हे या क्लासमध्ये शिकायला लागल्यावरच समजले.

क्लासमध्ये होणार्‍या दर दोन महिन्यांच्या परिक्षेवजा बैठकीत प्रत्येकाने वैयक्तिक गीत सादर करावे यासाठी बाईंचा आग्रह असतो. त्यामुळे स्टेजची व माईकची भिती कमी होते. बाहेर होणार्‍या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. क्लासचा वर्धापन दिन म्हणजे आम्हा सर्वांसाठी एक पर्वणीच असते. वर्षभर आपण जे शिकतो, ते आपल्या कुटुंबियांसमोर व मित्र-मैत्रिणींसामोर आपण अभिमानाने सादर करू शकतो. हा अनुभव आम्हा सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना फार मोलाचा वाटतो.




श्री. सुहास कुलकर्णी, नाशिक (नोकरी)
05 October 1999 (27 years ago)

साधारण दीड वर्षांपूर्वी मी क्लासला यायला सुरुवात केली आणि मला माझ्या गाण्यात खरोखर चांगला बदल होत असल्याचे दिसून आले. सभाधीटपणा होता, त्यात वाढ झाली. त्याला कारण म्हणजे क्लासमधल्या उपक्रमातील सातत्य. गाणे गातांना श्वासाचा वापर कसा करावा यासंबंधी शास्त्रशुद्ध माहिती मिळाली. क्लासमधील वातावरण अगदी मनमोकळे असले तरी त्याबरोबरच असणारी शिस्त, ही विद्यार्थ्यांना आवश्यक व लाभदायक आहे. कारण त्यामुळे गाण्याच्या प्रगतीस हातभारच लागतो.




सौ. ज्योती दातार, नाशिक (गृहिणी)
17 July 1999 (27 years ago)

गेल्या सहा वर्षांपासून मी क्लासला येत आहे. लग्नापूर्वी मध्य प्रदेशात असल्यामुळे शास्त्रीय संगीत शिकता आले. त्यामुळे संगीत विशारदही झाले. पण मराठी भावगीते, भक्तीगीते, इ. पासून वंचित राहिले. पण या क्लासमुळे आज मी चटकन कोणी गाणी म्हणायला सांगितली तर म्हणू शकते.सर्व प्रकारची गाणी येथे शिकवली जातात. लहान मुले, वयस्क स्त्री-पुरुष सर्वजण अगदी मन लावून शिकतात. कारण आमच्या बाईही प्रत्येकावर मेहनत घेतात. विद्यार्थ्याला एखादी ओळ जमत नसेल, तर न कंटाळता त्या तयार करून घेतात. तांबट सरही तालाविषयी महत्त्वाची माहिती देतात. नुसते गाणे म्हणता आले की झाले असे इथे चालत नाही, तर त्या गाण्याचा अर्थ समजावून सांगितला जातो. गीतकार, संगीतकार इ. सर्व माहिती आपल्याला हवी, या गोष्टीवर लक्ष दिले जाते.

सर्वच गोष्टी काही शब्दातून व्यक्त करता येत नाहीत, तर त्या अनुभवायच्या असतात.




सौ. इंदिरा टेंबे, नाशिक (गृहिणी)
19 November 1997 (29 years ago)

मी क्लासच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी! आम्हा सर्वांना या क्लासचा अतिशय फायदा झालेला आहे. त्यांचे शिकवणे अचूक असते. शब्दोच्चार, गाण्यातला भाव, ताल, सूर इ.गोष्टींकडे त्यांचे लक्ष असते. पूर्वी मी गाणं म्हणत असे, तेव्हा तालाकडे लक्षच नसे. पण आता तबल्याशिवाय गाणं म्हणतांनाही ते तालात कसे म्हणावे हे बाईंकडून शिकायला मिळाले. क्लासच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने वर्षभर जे काही शिकवले जाते ते वैयक्तिक किंवा सामुहिकरित्या सादर करण्याची संधी मिळते. दर दोन महिन्यांनी घेतल्या जाणार्‍या परिक्षावजा बैठकीमुळे स्टेज, माईक व श्रोत्यांची वाटणारी भिती कमी होण्यास मदत होते. वर्धापनदिनाच्या एक महिना आधी आमच्या बाई व नवीन तांबट, आमचे सर आमच्यासाठी खुप मेहनत घेत असतात. ते सुद्धा न कंटाळता ! नेहमी नवीन येणार्‍या विद्यार्थ्यांशी ओळख व्हावी व एकमेव खेळीमेळीचे वातावरण राहावे म्हणून क्लासची वार्षिक सहलही असते.

पाच ते सात वर्षांच्या वयोगटातील मुले-मुली, स्त्रिया-पुरुष या सर्वांचे गाण्याच्या निमित्ताने एक मोठे कुटुंबच जमलेले आहे.




श्री. राजेंद्र सराफ, नाशिक (बांधकाम व्यवसायिक)
11 October 1995 (31 years ago)

' साहित्य संगीत कला न ज्याते

लांगूल श्रृंगाविण की पशु ते '

असे संस्कार बालपणीच झाल्याने, संगीताची आवड निर्माण झाली. परंतु व्यवसाय, संसार इ. गोष्टींमुळे त्यावर लक्ष केंद्रीत करता आले नाही. पण थोडाफार वेळ तरी या कलेसाठी द्यावा असे वाटू लागले. शास्त्रीय संगीत थोडे शिकलो. पण त्यात सातत्य राहीना. त्यामुळे नाशिकमध्ये सौ. शुभदा तांबट यांनी सुगम संगीत विद्यालय सुरू केल्याची माहिती मिळताच मार्गदर्शन घेण्यासाठी क्लास सुरू केला. आणि 'सुगम' संगीत वाटते तेवढे सोपे नाही हे कळले.

या क्लासमध्ये अगदी योग्य पद्धतीने गाणे शिकवले जाते. बाईंच्या मनासारखे मनाच्या गळ्यातून आल्याशिवाय पुढचे गाणे शिकवले जात नाही.
बैठक कशी असावी, माईकवर गातांना कशी काळजी घ्यावी इ. गोष्टी शिकवल्या जातात. एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते, की गाणे तोंडपाठच झाले पाहिजे. वहीत बघून म्हणता कामा नये, असा बाईंचा आग्रह असतो. तो योग्यच आहे. कारण त्यामुळे आम्ही सर्व लक्ष गाण्याकडे पुरवू शकतो.
विद्यार्थ्यांनी अगदी अपरिहार्य कारणाशिवाय क्लासला गैरहजर राहू नये असे बाई सांगतात. जास्तीत जास्त उपस्थिती असणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जातात.

'चांदणे शिंपीत जाशी' या सौ. शुभदा तांबट सादर करीत असलेल्या मराठी गीतांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीनुसार वाव दिला जातो.
सूर, ताल, शब्द यांचा त्रिवेणी संगम जमून आल्याने गाणे चांगले गाता येते. त्याचा, माझ्यासारखाच सर्व विद्यार्थ्यांना आनंद होत असणार याबद्दल शंकाच नाही. स्वरदा सुगम संगीत विद्यालय म्हणजे नाशिकचे भूषण आहे.




सौ. अरुणा पाटील, नाशिक (गृहिणी)
10 March 1995 (31 years ago)

क्लासची चौकशी करायला जातांना मनात बर्‍याच शंका होत्या त्याला कारण इतरांबद्दलच्या ऐकीव गोष्टी देखील असतील.पण क्लास सुरू केल्यावर एक एक गोष्ट लक्षात यायला लागली. क्लासमध्ये एक घरगुती आणि स्वच्छ वातावरण आहे. आपुलकी आहे. कुठल्याही प्रकारे हातचं राखून न ठेवता गाणी शिकवली जातात. गाणे पूर्णपणे आत्मसात होईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जातो. क्लासची स्वत:ची भरपूर वादये आहेत. प्रत्येक महिन्यात तबल्यावर व माईकसमोर सराव घेतला जातो. क्लासच्या सर्व उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग असावा यावर लक्ष दिले जाते.

आणखी एक गोष्ट म्हणजे अत्यावश्यक कारणाशिवाय क्लासला सुट्टी न देणे, विद्यार्थ्यांची वर्षभर जास्तीत जास्त उपस्थिती असावी त्यासाठी प्रयत्न करणे, क्लास वेळेवर सुरू करणे, विद्यार्थ्यांनी फी वेळेवर भरावी यासाठी नियम करणे इ. सर्व गोष्टींमुळे क्लास प्रगतीपथावर आहे. क्लासची उत्तरोत्तर अशीच भरभराट होवो हीच सदिच्छा !